Tuesday, March 29, 2011

Koi deewana kehata hai..

कुणी दिवाणं म्हणतं मला,कुणी पागल समजणार,
पण ह्या धारेची तहान,फक्त ते ढग समजणार.
तू म्झ्याहून दूर कशी आहेस,अन मी दूर कसा?
हे तुझं मन समजणार,अन माझं मन समजणार.

भ्रमर कुण्या कळीवर भाळला तर होणार हंगामा,
आमच्या मनात कुठले स्वप्नं प्रसवले तर हंगामा.
एव्हाना डुबून ऐकत होते किस्से प्रेमाचे,
मी किस्स्याला,वास्तवात उतरवले तर हंगामा.

प्रेम तर एक पावन कथा आहे जाणिवांची
कधी कबीरा दिवाना होता,कधी मीरा दिवाणी आहे.
सगळे लोक म्हणतात,माझ्या डोळ्यात अश्रू आहेत.
जे तू समजली तर मोती,नाही तर पाणी आहे.

मूळ रचना : डॉ कुमार विश्वास.गाझियाबाद
अनुवाद:शिवानी दानी,नागपूर