Tuesday, January 19, 2010

तो क्रुष्ण कुठेय?????

सावली आणि वास्तवाचा
लपंडाव.
मनाचे खेळ,विचारांचे झुले,
भावनांचा डाव.

सगळं काही अपुर्ण,पुर्तता फ़क्त आशा.
विश्वासही निलाम झाला,दिशाहीन दिशा.

तोच आशय,तोच निलय,
तिच भुमिका,तिच जाणीव,
तेच निस्वार्थ झोकुन देणं,
तेच एकतारी जगणं,
तेच समाधान,तिच समजदारी
त्याच्या प्रेमाची........
निस्वार्थ मीरा आहे,
असीम प्रेम करणारी रुक्मिणी,
प्रेयसी राधा....
पण काळाच्या ह्या ओघात
तो क्रुष्ण कुठेय?????

D shivaनी
Nagpoor
16th jan 2010