Monday, November 23, 2009

असमंजस.....

गलित गात्रं चंद्र आज थोडा विसावतोय,
त्याला बघुन,
चांदण्याची तहान अजुन वाढतेय,
झिजताहेत त्या त्याच्या पहाडी सौंदर्याने.
समुद्राला उधाण आलय,त्याचं रंगित
जगणं निखरलेलं बघुन.
सुर्यं लोंबकाळतोय,अहोरात्रं पुन्हा
त्याला बघण्यासाठी.....
आणि माझ्या साठी तो,माझा प्रत्येक श्वास
रनोमाळ फ़ुलवतोय.....
माझ्या मिठीत विसावेल तो?

D shivaनी
Nagpoor