Tuesday, July 28, 2009

कहानी मे TwisT

आज मला कान्हा भेटला,
रस्त्याच्या कडेला ध्यानस्थ होता बहुतेक....
धन्य धन्य वाटले,
आणि थोड़े खाटकले सुद्धा.....
सामन्यांचं आणि समाजाचं
प्रतीनीधीत्व करणार्या अर्जुनाच्या
रथाचे सारथ्य करता करता हां इथे काय करतोय...???

सुट्टी की संपं.....???

मी वाट बघत होती,त्याचं ध्यान संपण्याची....

बराच वेळ झाला..
..थोडी हालचाल दिसते....

मी थोडी पुढे सरसावले.....

बघितलं तर सावळा चक्कं
काळा नीळा होऊंन निपचित पडला होता....
विचारलं का रे...तुझ्यावर ही वेळ...
म्हणाला,
कंटाळलो मी सारथ्यं करून,
भांबावलोय ....
हिच ती नियती...हे असं लिहिलं होतं...???
प्रश्नं पडलाय....
म्हणाला,ज्या वेगात निघालो होतो,
त्या force of action मुळे
चालतय सगळं....
पण आता ह्याचा वेग मंदावतोय...
चालेल जोवर गती आहे...
पण आता युगानुयुगांचा प्रवास
नाही होणार ह्या गतिने...

कहिच सहस्त्र वर्षं अजुन...

म्हणाला मी शोधतोय....नवा सारथी...........
आणि वाट बघतोय किंवा कारण शोधतोय
पुन्हा नव्याने सारथ्य करायची...

Friday, July 10, 2009

माझा पाऊस ...

माझा पाऊस ...

सकाळी सकाळी फ़िरायला जताना,
पाऊस जेव्हा मुजरा करतो,मी
चक्क इंद्रधनुश्य जमीनीवर अवतरतांना बघितलय...

दुपरी चहा पितांना,
पाऊस जेव्हा हेलकावा देऊन जातो...
खोलीत वफ़ेचे ढग जमतांना मी बघितलय...

office मधुन घरी जाताना
जेव्हा पाउस सलामी देतो...
तेव्हा सोन्याचे थेंब पडतांना मी बघितलय...

रात्री थकुन निजताना,
जेव्हा पाऊस कोसळतो...
उशी खाली सुरी घेऊन बरसतांना मी बघितलय..

D shivaनी
Nagpoor

Wednesday, July 8, 2009

मला का कुणी नाही थांबवलं????


पापण्या ह्या ओलावल्या,
मला कुणी नाही कळवलं,
मी संभ्रमात वास्तवाच्या,
मला काहिच नाही जाणवलं.

वेगात चेतवे मन,
अजाण जागी हरवलं,
मी साद घातली नेहमी पण
मला काहिच नाही गवसलं.

मी एक गतीने चालते,
थांबण्याची भीती वाटते,
पण मी चलतच आहे काळ,
मला का कुणी नाही थांबवलं????

D shivaनी
Nagpoor