Thursday, March 18, 2010

निखळ जगलो होतो.

अजुनही कातरवेळी
मी जाते त्या पारावर.
जीथे आपण एकदा
सहज विसावलो होतो.

संवादही प्रस्रुती,
ओळखीच्या रस्त्यावर,
जीथे आपण बोलण्यात
गुंग झालो होतो.

तुझे ते हसणे आपसुक,
मी मनात बांधुन ठेवलेय,
त्या चार क्षणांना अवचित,
आपण निखळ जगलो होतो.

D shivaनी
Nagpoor

Sunday, February 14, 2010

एलर्जी

मला पानझडिच्या
पानां समावेत गळुन गेल्यागत वाटतय,

क्षितीजावर पसरलेल्या
रंगांसारखं,टोटल मिक्स होऊन गेल्यागत वाटतय.

प्रवाहाच्याच दिशेने,
पण थोडं कडेनी प्रवास करावासा वाटतोय.

आणि आकाशात उंच,कधीही
परत न येता येण्यासाठी उडावसं वाटतय...

कटल्यावर पेचातुन पतंगी सारखं,
म्हणेल त्या दिशेनं वाहुन जावं वाटतय..

आले तर खुश ,
अन नाही तर अजुनच खुश मन आज होतय.

कदाचीत मला माणसांची एलर्जी होतेय....
आणि कदाचीत स्वतःची सुद्धा...........

D shivaनी
Nagpoor
21st jan 2010

Tuesday, January 19, 2010

तो क्रुष्ण कुठेय?????

सावली आणि वास्तवाचा
लपंडाव.
मनाचे खेळ,विचारांचे झुले,
भावनांचा डाव.

सगळं काही अपुर्ण,पुर्तता फ़क्त आशा.
विश्वासही निलाम झाला,दिशाहीन दिशा.

तोच आशय,तोच निलय,
तिच भुमिका,तिच जाणीव,
तेच निस्वार्थ झोकुन देणं,
तेच एकतारी जगणं,
तेच समाधान,तिच समजदारी
त्याच्या प्रेमाची........
निस्वार्थ मीरा आहे,
असीम प्रेम करणारी रुक्मिणी,
प्रेयसी राधा....
पण काळाच्या ह्या ओघात
तो क्रुष्ण कुठेय?????

D shivaनी
Nagpoor
16th jan 2010

Monday, November 23, 2009

असमंजस.....

गलित गात्रं चंद्र आज थोडा विसावतोय,
त्याला बघुन,
चांदण्याची तहान अजुन वाढतेय,
झिजताहेत त्या त्याच्या पहाडी सौंदर्याने.
समुद्राला उधाण आलय,त्याचं रंगित
जगणं निखरलेलं बघुन.
सुर्यं लोंबकाळतोय,अहोरात्रं पुन्हा
त्याला बघण्यासाठी.....
आणि माझ्या साठी तो,माझा प्रत्येक श्वास
रनोमाळ फ़ुलवतोय.....
माझ्या मिठीत विसावेल तो?

D shivaनी
Nagpoor

Monday, September 21, 2009

लिंबु चमचा...


जींकायचं सगळ्यांना असतं,
मग कोणाला कुठ्ल्या ध्येयासाठी,
तर कुणाला समधाना साठी,
कदाचीत तेच त्यांचं ध्येय असणार...
ह्या मार्गात,ध्येयाच्या धासात
आजुबाजुला कुणीच दिसत नाही..
आणि दिसायला पण नको नं,
ध्येय जे गाठायचं असतं,
शिखरावर पोहोचल्यावर हार तुरे
खुप मिळत असतात,मायेनं फ़िरवणारा
हाथ,आणि शेअर करणारा जोडिदार
फ़ारच कमी लोकांच्या नशीबी असतो..
मग अचानक मन विचार करु लागतं,
हाच तो विजय,हेच ते ध्येयं,
ज्या साठी आजवर इतके
compromises केले???
कशासाठी न का?
सुख म्हणता येईल ,ते वैभव,संपत्ती,
सम्रुद्धी,नाव सगळं आहे...
पण समाधान?????
न good companion????

म्हणुन वाटतं...

अयुष्य नं,लिंबु चमच्याची रेस आहे,
लिंबु घेउनच फ़िनिशिंग लाईन पार गेली तर
खरं जींकणं आणि तीच गम्मत आहे,
नाही तर खरं सांगते टोटल गफ़लत आहे..

D shivaनी
Nagpoor

Saturday, September 19, 2009

I am fed up of being PERFECT

लोकांना स्वतः मध्ये perfection
आणायला वर्ष उलटु द्यावी लागतात,
इथे जन्मजात सोन्याचं नशीब न जोडिला,
माणकाचं नाही तर कित्येक मण कैफ़
पायात घुटमळतात....

पाय मारील तिथुन कशाला रे पाणी काढलं,
कौतुकापेक्षा जळणारे जास्तं झाले....
हाथानी तारे तुटतील,ऎव्हढंच मोठं व्हायच
होतं,तसं मला.
पण चायला आजकाल तारे पण त्यांचे प्रोब्लेम्स
येऊन मला सांगतात...

मेहनत केली खरी,पण परिस्थीती ते करण्यास
तु आणली नं....
जीद्द मनात सहस्त्रं आयुष्य पादाक्रांत
करयची का रे जागवली मनात....
शेकडो वेळा पडले मी रस्त्यात,
प्रत्येक वेळी उठुन ध्येय गाठण्याचं धैर्य आपसुकच
मनात धगत होतं....
आग होती जींकण्याची...न मी जींकले सुद्धा....

खुप उंचावर येऊन गेले यार...
इथे लोक आहेत आजुबाअजुला पण जवळ मात्रं कोणीच नाही...
माझ्या उंचीचा complex आहे की भीती,तुलाच ठाऊक,
च्यायला इथे कोणी मनाला फ़ुटलेला पाझर बघायला कोणीच नाही...
perfect असली तरी मी पण साधाराण मनुष्य रे...
जींकणं शौक जरी असला माझा,तरी
प्रेमासाठी हजार वेळा हारायला मला ही आवडेल...
माझ्या शब्दावर,हजारो निर्णय बदलतात आता,
पण त्याने शब्दं न उगारता सुद्धा त्याच्या साठी माझे निर्णय
बदलवायला मला ही आवडेल....
oh god पण हे perfection अन हा विजय आड येतोय ....
perfection n success हवी होती नेहमी,
पण आयुष्यात जर का ती एकटे पणा देणार असेल तर
seriously देवा I am fed up of this PERFECTION n SUCCESS.....

D shivaनी
Nagpoor

Sunday, September 13, 2009

खर आहे ना????

तसं तर प्रत्येक नातं,
काहीना काही व्रण देतच असतं....
कही व्रणांचे ठसे आयुष्यभर राहतात,
तर काहींच्या जखमा होतात..
काही चिघळतात,तर काहींना
दुसर्या नात्याची खिपली चढते...
"प्रेम" नावाचं मलम एक जालीम
उपाय असतॊ ह्या सगळ्या जखमांवर..
अगदी ठसे हि विरवुन टाकण्याची किमया..
पण ब्रेक उप झालं,तर त्या जखमा
आणि त्यांचे व्रण तसेच राहतात,निरंतर.
कारण आता त्या जखमा भारायला
मलम कुठे उरलच नसतं,
आणि आपन उगाच प्रेमानी जखमा दिल्या
म्हणुन प्रेमाला बदनाम करतो....

कारण तसं तर प्रत्येक नातं काही ना काही
व्रण देतच असतं......
खर आहे ना????

D shivaनी
Nagpoor